Tag: काव्य
-

आनंदी पक्षी
केव्हां मारुनि उंच भरारी । नभांत जातो हा दूरवरी,आनंदाची सृष्टी सारी । आनंदें भरली. १ आनंदाचे फिरती वारे, । आनंदानें चित्त ओसरे,आनंदें खेळतो कसा रे । आनंदी पक्षी ! २ हिरवें हिरवें रान विलसतें, । वृक्षलतांची दाटी जेथें,प्रीती शांती जिथें खेळते । हा वसतो तेथें, ३ सुंदर पुष्पें जिथें विकसलीं, । सरोवरीं मधु कमलें फुललींकरीत…
-

संध्यारजनी
अस्तगिरीच्या अभिनव कुंजीं निजला निजनाथ,बघतां बघतां त्यास रंगलें वारुणिचें चित्त,हळुंच पाहते, मधुर हांसते, जाते लाजून,म्हणे मनाशीं, ‘जीव टाकुं का हा ओवाळून !’ प्रेमनिर्भरा बघुन सखीला भास्कर मायावीजातां जातां साखरचुंबा एक तिचा घेई !लाजलाजुनी जीव सतीचा मग अर्धा झाला,त्यांतच आल्या रोषाच्याही लहरी गालाला ! गेला, झाला द्दष्टिआडही सूर्य, तरी अजुनीपहा चकते प्रेमपताका पश्चिमदिग्वदनीं,थक्क होऊनी दिशा म्हणाल्या…
-

मधुयामिनि
मधुयामिनि नील-लताहो गगनीं कुसुमयुताधवलित करि पवनपथाकौमुदि मधु मंगला– दिव्य शांति चंद्रकरींआंदोलित नील सरींगिरिगिरिवरि, तरुतरुवरिपसरे नव भूतिला– सुप्रसन्न, पुण्य, शांतरामण्यकभरित धौतया मंगल मोहनांतविश्वगोल रंगला. कवी: त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी) कवितेचा सोपा सारांश: १. नक्षत्रांचे आणि चांदण्याचे सौंदर्य: कवी म्हणतात की, ही ‘मधुयामिनी’ (मधुर अशी रात्र) म्हणजे जणू एक निळी वेल आहे, ज्यावर नक्षत्रांची फुले उमलली आहेत.…
-

निर्झरास
गिरिशिखरें, वनमालाही दरीदरी घुमवित येई !कडयावरुनि घेऊन उडया खेळ लतावलयीं फुगडया.घे लोळण खडकावरती, फिर गरगर अंगाभंवतीं;जा हळुहळु वळसे घेत लपत – छपत हिरवाळींत; पाचूंचीं हिरवीं रानें झुलव गडे, झुळझुळ गानें !वसंतमंडप – वनराई आंब्याची पुढतीं येई.श्रमलासी खेळुनि खेळ नीज सुखें क्षणभर बाळ !हीं पुढचीं पिंवळीं शेतें सळसळती – गाती गीतें; झोंप कोठुनी तुला तरी, हांस…
-

निराशा (हे तासाचे तास)
हे तासाचे तास निघुनिया जाती,अंधार भरे मग चित्तीं,किति दडपण हें अवजड हृदयावरतींकष्ठानें बोलहि निघती, हें स्वप्नचि कीं जागृति न कळे कांहीं,जणु गहन मनावर येई,हीं भुतें पिशाच्चें सारीं,वार्यावर करिती स्वारी,मम चित्तहि त्यामाझारीं किति आरोळ्या घोर मृत्यूला देतेंमृतवत जों हें जग होतें.मग मद्यानें जेविं रक्त उसळावेंतशि घोर कल्पनाधावे मग तिजवरती काळे शार विचारगरगरगर उडती दुरहृदयीं हें असलें…
-

अरुण
पूर्व समुद्रीं छटा पसरली रम्य सुवर्णाचीकुणीं उधळिली मूठ नभीं ही लाल गुलालाची ?पूर्व दिशा मधु मृदुल हांसते गालींच्या गालीं.हषनिर्भरा दिशा डोलती या मंगल कालीं, क्षितिजाची कड सारविली ही उज्ज्वल दीप्तीनें,सृष्टिसतीनें गळां घाललें कीं अनुपम लेणें ?हे सोन्याचे, रक्तवर्ण हे, हे पिवळे कांहीं,रम्य मेघ हे कितेक नटके मिश्रित रंगांहीं, उदरांतुनि वाहते कुणाच्या सोन्याची गंगा,कुणीं लाविला विशुद्ध…
-

गाणार्या पक्ष्यास
समय रात्रीचा कोण हा भयाण !बळें गर्जे हें त्यांत घोर रान,अशा समयीं छबुकडया पांखरा तूं.गात अससी; बा काय तुझा हेतू ? गिरी वरतीं हा उंच उंच गेला,तमें केलें विक्राळ किती याला.दरी गर्जे, फूत्कार पहा येती,किती झंझानिक घोर वाहताती. दीर्घ करिती हे घूक शब्द कांहीं;क्रूर नादें त्या रान भरुनि जाई.अशा समयीं हें गोड तुझें गाणेंरम्य पक्ष्या,…
-

त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी) – निसर्गाचा गंध शब्दांत साठवणारा कवी
मराठी साहित्यात निसर्गाचे कोमल, जिवंत आणि भावपूर्ण चित्र उभे करणारे नाव म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे, ज्यांना आपण प्रेमाने “बालकवी” म्हणून ओळखतो. अल्पायुष्यातही त्यांनी आपल्या काव्यप्रतिभेने मराठी साहित्यविश्वात अमिट ठसा उमटवला. जन्म आणि बालपण पूर्ण नाव: त्र्यंबक बापूजी ठोंबरेटोपणनाव: बालकवीजन्म: 13 ऑगस्ट 1890जन्मस्थान: धामणगाव, जि. बुलढाणा, महाराष्ट्रमृत्यू: 5 मे 1918ओळख: निसर्गकवी, भावकवी लहानपणापासूनच त्यांना निसर्गाची ओढ…
-

औदुंबर
ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊननिळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडेशेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पायवाट पांढरी तयातुन अडवीतिडवी पडेहिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे झाकळुनी जळ गोड काळिमा पसरे लाटांवरपाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर कवी: त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी) 🌳 औदुंबर: कवितेचा सखोल अर्थ ही कविता अतिशय संथ आणि शांत…
-

श्रावणमास
बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांना केवळ निसर्गकवीच नाही, तर ‘निसर्गाचे लाडके लेक’ मानले जाते. त्यांचे अल्पायुष्य (केवळ २८ वर्षे) असूनही त्यांनी मराठी साहित्यात जे स्थान मिळवले आहे, ते अतुलनीय आहे. ही कविता श्रावण महिन्यातील निसर्गाचे सुंदर चित्र रेखाटते. श्रावणमासीं हर्ष मानसीं हिरवळ दाटे चोंहिकडे;क्षणांत येतें सरसर शिरवें क्षणांत फिरूनी ऊन पडे. वरती बघतां इंद्रधनूचा गोफ…