Marathi Stories

  • प्रियेचें ध्यान

    प्रियेचें ध्यान

    ” उद्यां प्रातःकालीं इथूनि मजला जाण निघणेंपुण्याला जाण्याला, स्वजन सगळा सोडुनि गडे; उद्यां एव्हां माझ्याविण वद कसें होइल तुला ?–दुणे तूझेवीणें श्रम सखि ! पथीं होतिल मला ! ” असें मोठया कष्टें तुजजवळिं मी पत्नि ! वदतां,गळां तूझे माझे, मम तव, सखे हस्त असतां, विशालाक्षीं तूझे जल भरुनियां मी न दिसुनी,वियोगाला भावी, समजलिस तूं भूत…

  • हरपलें श्रेय

    हरपलें श्रेय

    त्रिखंड हिंडुनि धुंडितसें,“ परि हरपलें तें गवसे ! ॥ध्रु०॥ हेत्यें अजाण माहेरींतों खेळ खेळल्यें परोपरीलटूपटीच्या घरदारींलटकीच जाहल्यें संसारी;तेव्हांचें सुख तें आतांखर्‍या घरींहि न ये हाता ! चुकचुकल्यापरिवाटे अन्तरि,होउनि बावरि निज श्रेय मी पाहतसें,न परि हरपलें तें गवसे !प्राप्त जाहले तें तुजलातूं मागितलें जें देवाला, ज्याचें मोल तुवां दिधलेंतेंच तुझ्या पदरी पडलें —या वचनें चुकला सौदाउमगुनि…

  • फूलपांखरू

    फूलपांखरू

    ( अंजनीगीत ) जेथें हिरवळ फार विलसते,लताद्रुमांची शोभा दिसते,तेथें फुलपांखरूं पहा हे—-सुंदर बागडतें ! कलिकांवरुनी, पुष्पांवरुनी,गन्धयुक्त अवकाशामधुनी,पुष्पपरागा सेनित हिंडे —मोदभरें करुनी ! तरल कल्पना जशी कवीची,सुन्दर विषयांवरुनी साचीभ्रमण करी, गति तशीच वाटे—फुलपांखराची ! वा मुग्धेची जैशी वृत्तिपतिसहवासस्वप्नावरतीविचरे फुलपांखराची तशी—हालचालही ती ! निर्वेधपणें इकडे तिकडेवनश्रींतुनी अहा ! बागडे;त्याचा हेवा ह्रदयीं उपजुनिमन होई वेडें ! तिमिरीं आम्हीं…

  • गोफण केली छान

    गोफण केली छान

    ( दोहा ) स्वह्रदय फाडुनि निज नखरींचिवट तयाचे दोरकाढुनि, गोफण वळितों हीसत्त्वाचा मी चोर ! त्वेषाचा त्या दोरालाघट्ट भरुनियां पीळ,गांठ मारितों वैराचीजी न पीळ दवडील ! वैर तयांला, बसती जेस्तिमितचि आलस्यांतवैर तयांला, पोकळ जेबडबडती तोर्‍यांत ! वैर तयांला, वैरी जेत्यांच्या पायधुळींतलोळुनि कृतार्थ होती जेप्राप्त तूपपोळींत ! वैर तयांला, पूर्वींच्याआर्त्यांचा बडिवारगाउनि जे निज षंढत्वामात्र दाविती फार…

  • नवा शिपाई

    नवा शिपाई

    नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें,कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !ब्राह्मण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा,तेचि पतित लीं ज आंखडिती प्रदेश साकल्याचा ! खादाड असे माझी भूक,चतकोरानें मला न सूख;कूपांतिल मी नच मंडूक; मळयास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें…

  • झपूर्झा

    झपूर्झा

    हर्षखेद ते मावळते,हास्य निमाले,अश्रु पळाले;कण्टकशल्यें लव वठली; कांहीं न दिसे दृष्टीलाप्रकाश गेला,तिमिर हरपला:काय म्हणावें या स्थितिला ?— झपूर्झा ! गडे झपूर्झा !हर्षशोक हे ज्यां सगळें,त्यां काय कळे ?त्यां काय वळे ? हंसतिल जरि ते आम्हांला,भय न धरुं हें वदण्याला :—व्यर्थीं अधिकचि अर्थ वसेतो त्यांस दिसे, ज्यां म्हणति पिसे,त्या अर्थाचे बोल कसे ?—झपूर्झा ! गडे झपूर्झा…

  • तुतारी

    तुतारी

    एक तुतारी द्या मज आणुनी,फुंकिन मी जो स्वप्राणानें,भेदुनि टाकित सगळीं गगनें —दीर्घ जिच्या त्या किंकाळीनें;अशी तुतारी द्या मजलागुनि, अवक्राशाच्या ओसाडींतिलपडसाद मुके जे आजवरीहोतिल ते वाचाल सत्वरीफुंक मारीतं जीला जबरी —कोण तुतारी ती मज देइल ? सारंगी ती सतार सुन्दरवीणा, वीनहि, मृदंग, बाजा,सूरहि, सनई, अलगुज माझ्या —कसचीं हीं हो पडतिल काजा ?एक तुतारी द्या तर सत्वर.…

  • अनंत

    विषय — विश्वाची अफाटता आणि नम्रता अनंत कवी — बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) तारे, आकाश आणि पृथ्वी — सारे अनंत. या अफाट पसाऱ्यासमोर माणसाचा ‘मी’ किती लहान आहे, हे सांगणारी बालकवींची तत्त्वचिंतनपर कविता. खाली संपूर्ण कविता, प्रत्येक कडव्याचा सोपा अर्थ, शब्दार्थ आणि प्रश्नमंजूषा दिली आहे. Anant by Balkavi — full Marathi poem with a simple…

  • पारवा — बालकवींची कविता

    विषय — एकाकीपण आणि विरक्ती पारवा कवी — बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) पडक्या धर्मशाळेच्या कौलावर बसलेला एक पारवा, भर दुपारची तप्त शांतता आणि त्याचे खिन्न घुमणे — बालकवींची सर्वाधिक गाजलेली आणि सर्वाधिक चर्चिली गेलेली कविता. खाली संपूर्ण कविता, प्रत्येक कडव्याचा सोपा अर्थ, शब्दार्थ आणि प्रश्नमंजूषा. Parva by Balkavi — the complete Marathi poem with a…

  • सुक्रोदय

    विषय — पहाटेचा शुक्रतारा सुक्रोदय कवी — बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) पहाटेच्या संधिकालात प्रकाश-अंधाराची झुंज आणि त्यातून उगवणारा तेजस्वी शुक्र — बालकवी त्याला ‘सौंदर्याचे केंद्र’ म्हणतात. खाली संपूर्ण कविता, प्रत्येक कडव्याचा सोपा अर्थ, शब्दार्थ आणि प्रश्नमंजूषा. Shukroday by Balkavi — the complete Marathi poem on the rising of Venus, with a stanza-by-stanza meaning, glossary and…