Marathi Stories
-
थकलेल्या भटकणाराचें गाणें
विषय — विरह, थकवा आणि उरलेली आशा थकलेल्या भटकणाराचें गाणें कवी — केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) वर्षानुवर्षे भटकून थकलेला एक जीव, विरहाने खचलेले मन आणि तरीही शेवटपर्यंत न सुटणारा एक प्रश्न — “ती मला भेटेल का?” खाली संपूर्ण कविता, प्रत्येक कडव्याचा सोपा अर्थ, शब्दार्थ आणि अभ्यासासाठी प्रश्न. Thakalelya Bhatkanaracha Gane by Keshavsut — the complete…
-
संध्याकाळ
विषय — समुद्रावरचा सूर्यास्त आणि एकटेपण संध्याकाळ कवी — केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) समुद्रात उतरणारा सूर्य, घरट्यांकडे परतणारे पक्षी, वासरांना हाक मारणाऱ्या गाई — आणि या सगळ्यात घरापासून दूर असलेला एक एकटा माणूस. खाली संपूर्ण कविता, प्रत्येक कडव्याचा सोपा अर्थ, शब्दार्थ आणि प्रश्नमंजूषा. Sandhyakal by Keshavsut — the complete Marathi poem with a stanza-by-stanza meaning,…
-
दिवा आणि तारा
विषय — उपयोग मोठा की प्रेरणा मोठी? दिवा आणि तारा कवी — केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) जमिनीवरचा दिवा आकाशातल्या ताऱ्याला हिणवतो — “तुझा उपयोग तरी काय?” आणि तारा अगदी शांत स्वरात जे उत्तर देतो, ते वाचकाला विचार करायला लावते. खाली संपूर्ण कविता, प्रत्येक कडव्याचा सोपा अर्थ, शब्दार्थ आणि प्रश्नमंजूषा. Diva ani Tara by Keshavsut —…
-
पुष्पाप्रत
विषय — फूल तेच, पाहणारा बदलला पुष्पाप्रत कवी — केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) लहानपणी जे फूल खेळगडी होते, तेच आता इतके पवित्र वाटते की त्याला स्पर्श करायलाही भीती वाटावी. फूल तसेच आहे — बदलला आहे तो पाहणारा. खाली संपूर्ण कविता, प्रत्येक कडव्याचा सोपा अर्थ, शब्दार्थ आणि प्रश्नमंजूषा. Pushpaprat by Keshavsut — the complete Marathi poem…
-
कविता आणि कवि
विषय — कवीचे स्वातंत्र्य कविता आणि कवि कवी — केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) “कविता अशी असावी, तशी नसावी” — असे सांगणाऱ्यांना केशवसुत थेट प्रश्न विचारतात: तुम्ही कोण? कवितेवरची ही कविता म्हणजे कवीच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा. खाली संपूर्ण कविता, प्रत्येक कडव्याचा सोपा अर्थ, शब्दार्थ आणि प्रश्नमंजूषा. Kavita ani Kavi by Keshavsut — a Marathi poem about poetry…
-

सृष्टि आणि कवि
( शिखरिणी ) वयस्या, गाते ही मदुधनरवें सृष्टि मधुर,कसा गाऊं तीच्यापुढति वद मी पामर नर ? तशी ती गातांना श्रुतिसुभग तीं पक्षिकवनेंकशासाठीं गावीं अरस कवनें मीं स्ववदनें ? मिषानें वृष्टीच्या खळखळ अशी सृष्टि रडतांकुणाची ढाळाया धजल तसले अश्रु कविता ? निशीथीं ती तैशी हळु मृदुमरुच्छ्वास करितांकवीची गा कोण्या त्यजिल तसले श्वास दुहिता ? कवी –…
-

प्रीति
प्रीति मिळेल का हो बाजारीं ?प्रीति मिळेल का हो शेजारीं ?प्रीति मेळेल का हो बागांत ?प्रीति मिळेल का हो शेतांत ? प्रीतिची नसे अशि ग मात;पहा शोधुनी ह्रदयांत ! नंदनवनामघीं आलाकल्पलतेला बहर भला;तिचीं ह्रदयीं बीजें पडलीं,प्रीति त्यांतूनी अवतरली ! प्रीतिची असे अशि ग मात;पहा आपुल्या ह्रदयांत ! प्रेमळ कृत्यांची माळप्रियजनकण्ठीं तूं घाल;द्विगुणित मग तो प्रीति…
-

एका तरुणीस
तरंग पहिला ( शिखरिणी ) अहा ! गे सृष्टीच्या वरतनु सुते ! निर्भयपणेंपहा अब्धीच्या या तरल लहरींचें उसळणें !—मनोराज्यीं जैशा विविध ह्रदयीं क्लूप्ति उठतीतशा ना अब्धीच्या तरल लहरी या विलसती ? मनोराज्याला या बघ जलधिच्या, फार विरळे !कशाला हे तूतें फुकट म्हटलें मीं ? नच कळे !स्वयें अब्धीला तूं बघत असतां पाहुनि, मुळीं,’ सुता तूं…
-

एक खेडें
( दिंडी ) सह्यगिरीच्या पायथ्याला सुपीकरम्य खोरें कोंकणामधीं एक;नदी त्यामधुनी एक वाहताहे,एक खेडें तीवरी वसुनि राहे. वदनि सुन्दर मन्दिरें न त्या ठायीं,परी साधीं झोंपडीं तिथें पाहीं;मन्दिरांतुनि नांदते रोगराई,झोंपडयांतुनि रोग तो कुठुनि राही ? रोग आहे हा बडा कीं मिजासी,त्यास गिर्द्यांवरि हवें पडायासी;झोंडयांतिल घोंगडयांवरी त्यास,पडुनि असणें कोठलें सोसण्यास ? उंच नाहिंत देवळें मुळीं तेथें,परी डोंगर आहेंत…
-

एका भारतीयाचे उद्गार
( मंदाक्रांता ) संध्याकाळीं बघुनि सगळी कान्गि ती पश्चिमेलावाटे सद्यःस्थितिच अपुली मूर्त ती मन्मनाला;हा ! हा ! श्रीचा दिवस अपुल्या मावळोनी प्रतीचेगेला ! गेला !” सहज पडती शब्द हे मन्मुखाचे. तेणें माथें फिरुनि सगळें जें म्हणोनी दिसावें,त्या त्या मध्यें स्वजनकुदशा वाचुनी मीं रडावें !जे जे चित्तीं बहुतकरुनी तें सुषुप्तींत भासे ”वृद्धांचें हें अनवितथ हो वाक्य…