Category: विंदा करंदीकर
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मराठी कवी विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर) यांच्या कविता मानवी अनुभव, सामाजिक वास्तव्य आणि तत्त्वज्ञानावर भाष्य करतात. ‘स्वेदगंगा’, ‘मृद्गंध’, ‘धृपद’ हे त्यांचे प्रमुख कवितासंग्रह आहेत [२]. ‘लागेल जन्मावे पुन्हा’, ‘नजर रोखुनी’, ‘अंधार’ या त्यांच्या गाजलेल्या कविता आहेत.
-

आयुष्याला द्यावे उत्तर
असे जगावे दुनियामधे ,आव्हानाचे लावून अत्तरनजर रोखूनी नजरेमध्ये ,आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची ,भीती आंधळ्या तारांचीआयुष्याला भिडताना हि, चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तरनजर रोखूनी नजरेमध्ये ,आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेतानाहसू असावे ओठांवरती ,काळीज कडून देताना संकाटासही ठणकावून सांगावे ,आता ये बहतरनजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला…
-

लागेल जन्मावें पुन्हां
माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,लागेल जन्मावें पुन्हां नेण्या तुला मझ्या घरी. तूं झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचें लाजशी;मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी. तूं बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढें,मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती कांहीतरी. होशी फुलासह फूल तूं अन् चांदण्यासह चांदणे,तें पाहणें, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करीं. म्हणतेस तूं, ” मज आवडे रांगडा…