Tag: तारकांचें गाणें
-

तारकांचें गाणें
कुणि नाहीं ग, कुणि नाहीं आम्हांला पाहत बाई,शांति दाटली चोंहिकडे, या ग, आतां पुढें पुढें,लाजतलाजत, हळूंच हांसत,खेळ गडे, खेळूं कांहीं, कोणीही पाहत नाहीं. १ सुंदरतेला नटवून, कोमलतेला खुणवून,प्रेमाच्या वसतीकरितां जगदंतर फुलवूं आतां,दिव्य सुरांनीं गीतें गाउनिविश्वाला निजवायाला वार्याचा बनवूं झोला, २ फेकुनि द्या इकडेतिकडे थोडेसे दंवबिंदु गडे,या निर्मल अवकाशांत प्रेमाचें पेरूं शेत,दिव्यमोहिनी – सवें गुंगुनीविश्वाला वत्सलतेनें …