Tag: जीर्ण दुर्ग
-

जीर्ण दुर्ग
दुर्ग भयंकर जीर्ण पसरला पुढतीं, जो गतकालींशूर साहसी नरसिंहांनीं अपुली वसती केली. कडयाकडयांमधिं घुमुनि नर्मदा गात यशोमय गीतें;सांगत होती सर्व देशभर सद्य:कर्तव्यातें. रंगमहालीं शेज फुलांची याच गडावर झाली,स्वातंत्र्यास्तव अग्नि भडकला – राख तयाची केली. तरवारीची धार देवता हीच जयांची एक,ब्रीद जयाचें सदा तियेला रुधिराचा अभिषेक. जीव नव्हे संसार ओपिला स्वातंत्र्यास्तव ज्यांनीं,त्या वीरांचा वास जाहला गतकालीं…