Tag: केशवसुत
-

प्रीति
प्रीति मिळेल का हो बाजारीं ?प्रीति मिळेल का हो शेजारीं ?प्रीति मेळेल का हो बागांत ?प्रीति मिळेल का हो शेतांत ? प्रीतिची नसे अशि ग मात;पहा शोधुनी ह्रदयांत ! नंदनवनामघीं आलाकल्पलतेला बहर भला;तिचीं ह्रदयीं बीजें पडलीं,प्रीति त्यांतूनी अवतरली ! प्रीतिची असे अशि ग मात;पहा आपुल्या ह्रदयांत ! प्रेमळ कृत्यांची माळप्रियजनकण्ठीं तूं घाल;द्विगुणित मग तो प्रीति…
-

एका तरुणीस
तरंग पहिला ( शिखरिणी ) अहा ! गे सृष्टीच्या वरतनु सुते ! निर्भयपणेंपहा अब्धीच्या या तरल लहरींचें उसळणें !—मनोराज्यीं जैशा विविध ह्रदयीं क्लूप्ति उठतीतशा ना अब्धीच्या तरल लहरी या विलसती ? मनोराज्याला या बघ जलधिच्या, फार विरळे !कशाला हे तूतें फुकट म्हटलें मीं ? नच कळे !स्वयें अब्धीला तूं बघत असतां पाहुनि, मुळीं,’ सुता तूं…
-

एक खेडें
( दिंडी ) सह्यगिरीच्या पायथ्याला सुपीकरम्य खोरें कोंकणामधीं एक;नदी त्यामधुनी एक वाहताहे,एक खेडें तीवरी वसुनि राहे. वदनि सुन्दर मन्दिरें न त्या ठायीं,परी साधीं झोंपडीं तिथें पाहीं;मन्दिरांतुनि नांदते रोगराई,झोंपडयांतुनि रोग तो कुठुनि राही ? रोग आहे हा बडा कीं मिजासी,त्यास गिर्द्यांवरि हवें पडायासी;झोंडयांतिल घोंगडयांवरी त्यास,पडुनि असणें कोठलें सोसण्यास ? उंच नाहिंत देवळें मुळीं तेथें,परी डोंगर आहेंत…
-

एका भारतीयाचे उद्गार
( मंदाक्रांता ) संध्याकाळीं बघुनि सगळी कान्गि ती पश्चिमेलावाटे सद्यःस्थितिच अपुली मूर्त ती मन्मनाला;हा ! हा ! श्रीचा दिवस अपुल्या मावळोनी प्रतीचेगेला ! गेला !” सहज पडती शब्द हे मन्मुखाचे. तेणें माथें फिरुनि सगळें जें म्हणोनी दिसावें,त्या त्या मध्यें स्वजनकुदशा वाचुनी मीं रडावें !जे जे चित्तीं बहुतकरुनी तें सुषुप्तींत भासे ”वृद्धांचें हें अनवितथ हो वाक्य…
-

अढळ सौंदर्य
( दिंडी ) तोच उदयाला येत असे सूर्य.अहो क्षितिजावर त्याच नव्हे काय ? तेच त्याचे कर न का कुकुमानेंवदन पूर्वेचें भरिती सभ्रमानें ? तेच तरु हे तेंशाच पुष्पभारेंलवुनि गेले दिसतात पहा सारे ! त्याच वल्ली तेंसेंच पुष्पहास्यहंसुनि आजहि वेधिती या मनास ! कालचे जें कीं तेच आज पक्षीकालच्या हो ज्या त्याच आज वृक्षों बसुनि गाती…
-

प्रियेचें ध्यान
” उद्यां प्रातःकालीं इथूनि मजला जाण निघणेंपुण्याला जाण्याला, स्वजन सगळा सोडुनि गडे; उद्यां एव्हां माझ्याविण वद कसें होइल तुला ?–दुणे तूझेवीणें श्रम सखि ! पथीं होतिल मला ! ” असें मोठया कष्टें तुजजवळिं मी पत्नि ! वदतां,गळां तूझे माझे, मम तव, सखे हस्त असतां, विशालाक्षीं तूझे जल भरुनियां मी न दिसुनी,वियोगाला भावी, समजलिस तूं भूत…
-

हरपलें श्रेय
त्रिखंड हिंडुनि धुंडितसें,“ परि हरपलें तें गवसे ! ॥ध्रु०॥ हेत्यें अजाण माहेरींतों खेळ खेळल्यें परोपरीलटूपटीच्या घरदारींलटकीच जाहल्यें संसारी;तेव्हांचें सुख तें आतांखर्या घरींहि न ये हाता ! चुकचुकल्यापरिवाटे अन्तरि,होउनि बावरि निज श्रेय मी पाहतसें,न परि हरपलें तें गवसे !प्राप्त जाहले तें तुजलातूं मागितलें जें देवाला, ज्याचें मोल तुवां दिधलेंतेंच तुझ्या पदरी पडलें —या वचनें चुकला सौदाउमगुनि…
-

फूलपांखरू
( अंजनीगीत ) जेथें हिरवळ फार विलसते,लताद्रुमांची शोभा दिसते,तेथें फुलपांखरूं पहा हे—-सुंदर बागडतें ! कलिकांवरुनी, पुष्पांवरुनी,गन्धयुक्त अवकाशामधुनी,पुष्पपरागा सेनित हिंडे —मोदभरें करुनी ! तरल कल्पना जशी कवीची,सुन्दर विषयांवरुनी साचीभ्रमण करी, गति तशीच वाटे—फुलपांखराची ! वा मुग्धेची जैशी वृत्तिपतिसहवासस्वप्नावरतीविचरे फुलपांखराची तशी—हालचालही ती ! निर्वेधपणें इकडे तिकडेवनश्रींतुनी अहा ! बागडे;त्याचा हेवा ह्रदयीं उपजुनिमन होई वेडें ! तिमिरीं आम्हीं…
-

गोफण केली छान
( दोहा ) स्वह्रदय फाडुनि निज नखरींचिवट तयाचे दोरकाढुनि, गोफण वळितों हीसत्त्वाचा मी चोर ! त्वेषाचा त्या दोरालाघट्ट भरुनियां पीळ,गांठ मारितों वैराचीजी न पीळ दवडील ! वैर तयांला, बसती जेस्तिमितचि आलस्यांतवैर तयांला, पोकळ जेबडबडती तोर्यांत ! वैर तयांला, वैरी जेत्यांच्या पायधुळींतलोळुनि कृतार्थ होती जेप्राप्त तूपपोळींत ! वैर तयांला, पूर्वींच्याआर्त्यांचा बडिवारगाउनि जे निज षंढत्वामात्र दाविती फार…
-

नवा शिपाई
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें,कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें !ब्राह्मण नाहीं, हिंदुहि नाहीं, न मी एक पंथाचा,तेचि पतित लीं ज आंखडिती प्रदेश साकल्याचा ! खादाड असे माझी भूक,चतकोरानें मला न सूख;कूपांतिल मी नच मंडूक; मळयास माझ्या कुंपण पडणें अगदीं न मला साहे !कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें…