Category: केशवसुत
कृष्णाजी केशव दामले (टोपणनाव: केशवसुत) ( ७ ऑक्टोबर १८६६: मालगुंड – ७ नोव्हेंबर, १९०५) हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.
वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते.[२] आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत.
-

झपूर्झा
हर्षखेद ते मावळते,हास्य निमाले,अश्रु पळाले;कण्टकशल्यें लव वठली; कांहीं न दिसे दृष्टीलाप्रकाश गेला,तिमिर हरपला:काय म्हणावें या स्थितिला ?— झपूर्झा ! गडे झपूर्झा !हर्षशोक हे ज्यां सगळें,त्यां काय कळे ?त्यां काय वळे ? हंसतिल जरि ते आम्हांला,भय न धरुं हें वदण्याला :—व्यर्थीं अधिकचि अर्थ वसेतो त्यांस दिसे, ज्यां म्हणति पिसे,त्या अर्थाचे बोल कसे ?—झपूर्झा ! गडे झपूर्झा…
-

तुतारी
एक तुतारी द्या मज आणुनी,फुंकिन मी जो स्वप्राणानें,भेदुनि टाकित सगळीं गगनें —दीर्घ जिच्या त्या किंकाळीनें;अशी तुतारी द्या मजलागुनि, अवक्राशाच्या ओसाडींतिलपडसाद मुके जे आजवरीहोतिल ते वाचाल सत्वरीफुंक मारीतं जीला जबरी —कोण तुतारी ती मज देइल ? सारंगी ती सतार सुन्दरवीणा, वीनहि, मृदंग, बाजा,सूरहि, सनई, अलगुज माझ्या —कसचीं हीं हो पडतिल काजा ?एक तुतारी द्या तर सत्वर.…